रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स – भाऊ-बहिणीसाठी 3D, पारंपरिक आणि सुंदर फोटो कल्पना

लेखक: रविंद्र पारधी (Founder, Marathi AI Prompts) | शेवटचे अपडेट: ऑगस्ट २०२६ | वाचनासाठी वेळ: १६-१८ मिनिटे

रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यासमोर येते ती राखीची ओवाळणी, गोड पेढे आणि भाऊ-बहिणीच्या नात्यातील विलक्षण जिव्हाळा. लहानपणापासून हा सण प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी, त्यामागची भावना मात्र सगळीकडे सारखीच असते. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे आणि भावाने तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देणे, हाच या सणाचा गाभा आहे.

दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण, यंदा २०२६ मध्ये २८ ऑगस्ट, शुक्रवार रोजी आहे. पण आता तो फक्त राखी बांधण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाचा वापर इतका वाढला आहे की सण साजरा करण्याची पद्धतच बदलून गेली आहे.

आता अनेक जण रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरून भाऊ-बहिणीचे खास 3D अवतार, पारंपारिक महाराष्ट्रीयन लुक आणि सोशल मीडियासाठी सुंदर भाऊ बहीण AI फोटो तयार करत आहेत. हे फोटो व्हॉट्सॲप स्टेटस, इंस्टाग्राम रील्स आणि फेसबुक पोस्टवरून एकमेकांना पाठवले जातात.

ज्या भावंडांना यंदा एकत्र राहून सण साजरा करता येणार नाही, कदाचित एक जण परदेशात राहत असेल, तर दुसरा नोकरीनिमित्त महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरात राहत असेल, त्यांच्यासाठी हे राखी AI फोटो एक वेगळाच आनंद देतात. जुन्या फोटोंना नवा साज चढवून तो एक खास आठवण म्हणून जपता येतो.

या लेखात थेट कॉपी-पेस्ट करता येणारे १६ फ्री रक्षाबंधन फोटो प्रॉम्प्ट्स दिले आहेत. हे ChatGPT,Gemini, Bing Image Creator किंवा FLUX सारख्या विविध AI image tools मध्ये वापरून पाहता येतील. प्रत्येक टूलमध्ये मात्र परिणाम वेगळा येऊ शकतो, आणि अंतिम रिझल्ट तुम्ही वापरत असलेल्या AI tool आणि त्याच्या settings नुसार बदलतो.

AI prompts वापरताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट 

AI image prompts वापरताना एक गोष्ट वारंवार जाणवते. एकाच प्रॉम्प्टमधून प्रत्येक टूलमध्ये सारखाच परिणाम मिळत नाही. काही वेळा पारंपरिक कपड्यांचे तपशील चांगले येतात, तर काही वेळा चेहरा, हात किंवा backgorund मध्ये सुधारणा करावी लागते. त्यामुळे खालील प्रॉम्प्ट्स वेगवेगळ्या शैली आणि वापराच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले आहेत. हे प्रॉम्प्ट्स कोणताही बदल न करता जसेच्या तसे वापरता येतील, किंवा आवडीनुसार कपडे, रंग, background आणि lighting बदलून पाहता येईल. प्रत्येक टूलवर निकाल किंचित वेगळा येऊ शकतो, हे लक्षात ठेवा.

Contents

अनुक्रमाणिका

  • रक्षाबंधनासाठी AI फोटो कसे तयार करावे? (Raksha Bandhan AI Photo Editing स्टेप्स)
  • कोणतं AI टूल कधी वापरावं?
  • प्रॉम्प्ट कस्टमाइज कसं करायचं?
  • भाऊ-बहिणीचे रक्षाबंधन 3D AI फोटो प्रॉम्प्ट्स (Raksha Bandhan AI Photo Prompts)
  • महाराष्ट्रीयन फेटा-पैठणी प्रॉम्प्ट्स
  • लहान मुलांसाठी क्युट प्रॉम्प्ट्स
  • Realistic Cinematic रक्षाबंधन प्रॉम्प्ट्स
  • नाव आणि शुभेच्छांसाठी पोस्टर प्रॉम्प्ट्स
  • AI फोटो चांगला दिसण्यासाठी टिप्स
  • Negative Prompts आणि सामान्य चुका
  • फोटो अपलोड करताना काळजी
  • सोशल मीडिया कॅप्शन कल्पना
  • प्रॉम्प्ट निवडताना कोणता विचार करावा?
  • AI फोटोंचा वापर फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नाही
  • FAQ
  • संबंधित लेख

रक्षाबंधनासाठी AI फोटो कसे तयार करावे? (Raksha Bandhan AI Photo Editing स्टेप्स)

खाली दिलेले रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरून फोटो कसा तयार करायचा, हे सोप्या स्टेप्समध्ये सांगितलं आहे. ही पद्धत सर्वसाधारणपणे सर्व AI image tools साठी लागू पडते., फक्त इंटरफेस थोडा वेगळा असू शकतो.

१. स्पष्ट फोटो निवडा

भाऊ आणि बहीण दोघांचा चेहरा नीट दिसणारा, चांगल्या उजेडातील फोटो निवडा. शक्यतो समोरून काढलेला आणि धूसर नसलेला फोटो निवडावा. चेहऱ्यावर सावली नसेल तर सर्वात जास्त परिणाम मिळतो.

२. AI टूल उघडा

ChatGPT, Gemini, Bing Image Creator किंवा FLUX यापैकी कोणतंही टूल उघडा. तुमच्या गरजेनुसार योग्य वाटेल ते निवडा.

३. फोटो अपलोड करा

चॅटबॉक्समध्ये फोटो अपलोड करा. काही टूल्समध्ये फोटो अपलोड न करता फक्त टेक्स्ट प्रॉम्प्टवरूनही नवीन इमेज तयार होते.

४. प्रॉम्प्ट पेस्ट करा

खालीलपैकी जो प्रॉम्प्ट तुम्हाला आवडेल, तो कॉपी-पेस्ट करा. गरज वाटल्यास कपडे, रंग किंवा background मध्ये बदल करा.

५. रिझल्ट तपासा

फोटो जेनरेट झाल्यावर हात, चेहरा आणि इतर तपशील नीट समजून घ्या. काही चुका दिसल्यास पुन्हा generate करा.

६. डाउनलोड आणि शेअर करा

फोटो आवडल्यास डाउनलोड करा आणि Instagram, WhatsApp Status किंवा Facebook वर शेअर करा.

कोणतं AI टूल कधी वापरावं?

फोटो अपलोड करून नवीन style तयार करायची असेल आणि तपशीलवार instructions घ्यायच्या असतील,तर ChatGPT उपयोगी पडतं. मोबाईलवर जलद result हवा असेल तर Gemini बरं पडतं. Image generation आणि detailing वर भर द्यायचा असेल तर Bing Image Creator निवडता येतं. आणि realistic किंवा cinematic style हवी असेल, तर FLUX हा योग्य पर्याय ठरतो.

एकाच प्रॉम्प्टचा result प्रत्येक AI tool मध्ये वेगळा येऊ शकतो. त्यामुळे एका tool वर समाधान न झाल्यास दुसऱ्या tool वर तोच prompt वापरून पाहावा. कोणतं टूल तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल, याबद्दल सविस्तर तुलना best AI tools for Marathi users या लेखात वाचता येईल.

प्रॉम्प्ट कस्टमाइज कसं करायचं: एक उदाहरण

समजा प्रॉम्प्ट १ वापरायचा आहे, पण त्यातला background बदलायचा आहे.

मूळ ओळ: 

soft pastel background with tiny floating diyas and flower petals

बदललेली ओळ:

soft peach-orange sunset background with tiny floating diyas and marigold petals

अशा प्रकारे कपड्यांचा रंग, दागिने आणि background मधील घटक बदलून prompt personalize करता येतो. प्रॉम्प्ट लिहिण्याची योग्य पद्धत आणि अधिक टिप्ससाठी AI prompt कसा लिहावा हा लेख उपयुक्त ठरेल.

भाऊ-बहिणीचे रक्षाबंधन 3D फोटो प्रॉम्प्ट्स (Raksha Bandhan AI Photo Prompts)

3D avatar style बद्दल अधिक कल्पनांसाठी 3D AI image prompts मराठीमध्ये हा लेखही पाहता येईल.

प्रॉम्प्ट १: क्लासिक 3D सिबलिंग अवतार

Transform the uploaded photo of a brother and sister into a cute high-quality 3D animated film style avatar. Big expressive eyes, soft rounded facial features, warm golden lighting, both characters smiling while sister ties rakhi on brother’s wrist, soft pastel background with tiny floating diyas and flower petals, highly detailed, festive Raksha Bandhan mood.

Prompt 1 वापरून तयार केलेला 3D रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा AI फोटो
AI-generated sample — Prompt 1 वापरून तयार केलेला 3D Raksha Bandhan फोटो.

प्रॉम्प्ट २: मराठमोळा 3D अवतार

Create a cute family-friendly 3D cartoon style avatar of a Maharashtrian brother and sister duo celebrating Raksha Bandhan, sister in a simple cotton saree with bindi, brother wearing a kurta, both standing near a rangoli decorated doorstep, soft studio lighting, vibrant colors, clean background, sharp detailed render.

प्रॉम्प्ट ३: फ्रेंडली 3D स्टुडिओ पोर्ट्रेट

Soft rounded 3D character design portrait of siblings, brother and sister standing close together laughing, holding a rakhi thali between them, warm indoor lighting, clean studio background, cheerful expressions, smooth textures, high resolution render.

महाराष्ट्रीयन फेटा-पैठणी प्रॉम्प्ट्स

पारंपरिक लूक हवा असणाऱ्यांसाठी हे रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स खास उपयोगी आहेत. पारंपरिक महाराष्ट्रीयन cinematic पोर्ट्रेटबद्दल अधिक प्रॉम्प्ट्ससाठी Maharashtrian cinematic portrait AI prompt हा लेख पाहता येईल.

प्रॉम्प्ट ४: फेटा-पैठणी सिनेमॅटिक लुक

Realistic portrait of a brother wearing a traditional Maharashtrian red-golden pheta (turban) and a cream silk kurta, standing beside his sister dressed in an authentic green Paithani saree with traditional nath and jhumka, sister tying a rakhi on brother’s wrist, golden hour lighting, warm color grading, natural skin texture, shallow depth of field.

Prompt 4 वापरून तयार केलेला महाराष्ट्रीयन पारंपरिक रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा AI फोटो
AI-generated sample — Prompt 4 वापरून तयार केलेला महाराष्ट्रीयन पारंपरिक रक्षाबंधन फोटो.

प्रॉम्प्ट ५: राजवाडा थीम रक्षाबंधन

Realistic royal-style portrait, brother and sister in Maharashtrian traditional attire standing in front of an old stone fort (gad-kille) background, brother in golden pheta and bandhgala, sister in nauvari saree with traditional jewelry, dramatic warm lighting, detailed skin texture, natural photographic quality.

प्रॉम्प्ट ६: नऊवारी साडी घरगुती लुक

Warm realistic photo of a sister in a traditional nauvari saree tying rakhi on her brother’s wrist who wears a simple white kurta and dhoti, home courtyard setting with a rangoli and diyas nearby, soft natural daylight, authentic Maharashtrian festive atmosphere, detailed textures.

प्रॉम्प्ट ७: पारंपारिक पूजा थाळी दृश्य

Traditional Maharashtrian Raksha Bandhan scene, sister performing aarti and tying rakhi on brother’s wrist near a decorated pooja thali with kumkum, rice, and sweets, both in simple traditional attire, warm home lighting, realistic detailed photography style.

लहान मुलांसाठी क्युट प्रॉम्प्ट्स

लहान भावंडांसाठी वेगळे रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स हवे असणाऱ्यांसाठी हा भाग उपयुक्त आहे.

प्रॉम्प्ट ८: लहान मुलांचा क्युट 3D फोटो

Adorable cute family-friendly 3D cartoon style rendering of a young brother and little sister, big sparkly eyes, chubby cheeks, sister wearing a small lehenga and tying a colorful rakhi on brother’s wrist who wears a small kurta, surrounded by balloons, sweets (mithai) and confetti, bright cheerful pastel background, soft rounded character design, high resolution.

प्रॉम्प्ट ९: लहान भावंडांचा रिअलिस्टिक फोटो

Realistic warm photo of a small brother and sister, sister tying rakhi on brother’s wrist while both smile, wearing small traditional festive clothes, soft home lighting, natural candid expressions, gentle color tones, detailed but gentle rendering suitable for young children.

प्रॉम्प्ट १०: मुलांचा ग्रीटिंग कार्ड स्टाईल फोटो

Cute greeting-card style illustration of a young brother and sister celebrating Raksha Bandhan, simple rounded shapes, warm pastel colors, small diyas and flowers around them, soft flat lighting, cheerful and gentle art style.

Realistic Cinematic रक्षाबंधन प्रॉम्प्ट्स

Realistic आणि emotional टच हवा असल्यास हे रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स निवडता येतात.

प्रॉम्प्ट ११: गोल्डन अवर सिनेमॅटिक फोटो

Cinematic realistic photo of brother and sister sharing a warm moment during Raksha Bandhan, golden hour outdoor lighting, soft bokeh background, natural expressions, warm color grading, shallow depth of field, film-still quality.

Prompt 11 वापरून तयार केलेला गोल्डन-अवर सिनेमॅटिक रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा AI फोटो
AI-generated sample — Prompt 11 वापरून तयार केलेला गोल्डन-अवर सिनेमॅटिक रक्षाबंधन फोटो.

प्रॉम्प्ट १२: घरातील उबदार क्षण

Realistic indoor photograph style image of sister tying rakhi on brother’s wrist, soft warm lamp lighting, cozy home background with festive decorations, natural skin tones, candid emotional expression, detailed but natural photographic look.

प्रॉम्प्ट १३: छतावरील संध्याकाळचा फोटो

Realistic cinematic photo of siblings standing on a rooftop during evening, city or village skyline softly blurred in background, warm orange-blue sky, natural wind-blown hair, candid emotional moment, film-like color tones.

नाव आणि शुभेच्छांसाठी पोस्टर प्रॉम्प्ट्स

प्रॉम्प्ट १४: गोल्डन नेम पोस्टर

Cinematic Raksha Bandhan poster design, brother and sister silhouette in the center, elegant glowing golden text area at the bottom left empty for adding a name later, dark royal navy blue background with subtle gold particle effects, festive design, high contrast, premium poster quality.

प्रॉम्प्ट १५: व्हॉट्सॲप स्टेटस स्पेशल

Vertical mobile wallpaper style Raksha Bandhan photo, brother and sister traditional portrait in the upper half, soft bokeh lights in background, an empty elegant space at the bottom for adding festive text later, premium festive design, suitable for WhatsApp status.

प्रॉम्प्ट १६: मिनिमल ग्रीटिंग पोस्टर

Minimal elegant Raksha Bandhan greeting poster design, soft pastel background with a rakhi thread illustration, clean empty space in the center-bottom for adding a name or message afterward, warm soft color palette, high-quality flat design style.

AI फोटो चांगला दिसण्यासाठी टिप्स

रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरताना खालील छोट्या टिप्स लक्षात ठेवल्यास result अधिक चांगला मिळतो.

  • एका वेळी एकच बदल करा, म्हणजे नेमकं काय परिणाम करतंय हे कळतं.
  • Lighting स्पष्ट सांगा.
  • Realistic result हवा असेल तर तसा शब्द वापरा.
  • एका tool वर मन न भरल्यास दुसरं वापरून पाहा.
  • कपड्यांचे रंग आणि fabric नेमकेपणाने सांगा.
  • Instagram साठी 1:1 आणि Story किंवा Status साठी 9:16 format निवडावा.
  • शक्य असल्यास दोघांचा एकत्र असलेला स्पष्ट फोटो वापरा.
  • मूळ फोटोतील pose आणि expression लक्षात घ्या, तसचं जुळवण्याचा प्रयत्न करा.
  • एकाच वेळी अनेक variations तयार करून त्यातलं सर्वोत्तम निवडा.
  • डाउनलोड करण्यापूर्वी हात, बोटं आणि दागिन्यांचे details झूम करून एकदा तपासून घ्या.

Negative Prompts आणि सामान्य चुका

AI tool मध्ये negative prompt ची सुविधा असेल, तर खालील टेक्स्ट वापरून पाहता येईल.

extra fingers, distorted hands, blurry face, unnatural eyes, watermark, low quality, deformed features, extra limbs.

सामान्य समस्या आणि उपाय

समस्याउपाय
हाताची बोटं विचित्र दिसतातdistorted hands, extra fingers वापरून पुन्हा generate करा
चेहरा वेगळा दिसतोस्पष्ट आणि समोरून काढलेला फोटो वापरा
Background गोंधळलेला येतोclean background किंवा softly blurred background वापरा
कपडे वेगळे येतातरंग आणि fabric सुरुवातीलाच स्पष्ट लिहा

 

Negative prompts ची संपूर्ण यादी आणि सविस्तर वापर Negative prompt list for AI image generation या लेखात मिळेल.

फोटो अपलोड करताना काळजी

रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरताना मूळ प्रतिमा अपलोड करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा वापरण्यापूर्वी त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे, आणि लहान मुलांच्या प्रतिमांसाठी पालकांची संमती घ्यावी. संवेदनशील किंवा वैयक्तिक फोटो अनोळखी सेवांवर अपलोड करणं टाळावं, आणि वापरण्याआधी AI tool ची privacy आणि commercial-use policy एकदा तपासून घ्यावी.

प्रसिद्ध व्यक्ती किंवा copyrighted characters ची हुबेहूब प्रतिमा तयार करणं टाळावं. फोटो किती काळ साठवला जाऊ शकतो हे तपासून घेणं चांगलं, आणि watermark असलेला दुसऱ्या व्यक्तीचा फोटो वापरणंही टाळावं.

सोशल मीडिया कॅप्शन कल्पना

रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरून तयार केलेल्या फोटोसोबत खालीलपैकी कॅप्शन वापरता येतील.

  • “राखीचा धागा नाही, हा तर विश्वासाचा बांध आहे.”
  • “लांब असलो तरी मन जवळच आहे रे भाऊ.”
  • “ताई,तुझ्याशिवाय हा सण अपुराच वाटतो.”
  • “प्रत्येक राखीमागे एक आठवण, एक वचन.”
  • “भाऊ-बहिणीचं नातं शब्दात मावत नाही, ते फक्त अनुभवायचं असतं.”

Hashtags

#RakshaBandhan2026 #भाऊबहीण #RakhiSpecial #MarathiFestival #SiblingLove #AIPhoto #RakhiPurnima #राखीपौर्णिमा

प्रॉम्प्ट निवडताना कोणता विचार करावा?

इतके सगळे पर्याय बघितल्यावर योग्य रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स कसे निवडावेत, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मजेशीर आणि क्युट फोटो हवे असतील तर प्रॉम्प्ट १ ते ३ आणि ८ योग्य ठरतात. पारंपरिक महाराष्ट्रीयन फोटोसाठी प्रॉम्प्ट ४ ते ७ पाहावेत. Realistic आणि emotional फोटोसाठी प्रॉम्प्ट ११ ते १३ निवडावेत, तर status किंवा नाव असलेल्या posters साठी प्रॉम्प्ट १४ ते १६ वापरता येतील.

AI फोटोंचा वापर फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नाही

हे AI फोटो सोशल मीडियाशिवायही वापरता येतात. उदाहरणार्थ custom rakhi card बनवण्यासाठी, photo frame gift म्हणून, family WhatsApp group च्या DP साठी, किंवा digital scrapbook तयार करण्यासाठी हे फोटो सहज वापरता येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. हे प्रॉम्प्ट्स वापरण्यासाठी पैसे लागतात का?

उत्तर: नाही, हे प्रॉम्प्ट्स मोफत वापरता येतात. मात्र काही AI tools च्या free version मध्ये image generation ची मर्यादा असू शकते.

२. मोबाईलवरून हे प्रॉम्प्ट्स वापरता येतील का?

उत्तर: हो, मोबाईलवरूनही हे प्रॉम्प्ट्स वापरता येतात.

३. फोटोत चेहरा नीट न आल्यास काय करावं?

उत्तर: स्पष्ट, समोरून काढलेला आणि चांगल्या उजेडातील मूळ फोटो वापरा. गरज पडल्यास negative prompt वापरून पुन्हा इमेज तयार करा.

४. फोटोवर मराठी नाव किंवा मजकूर टाकता येतो का?

उत्तर: हो, पण काही AI tools मध्ये देवनागरी मजकूर अचूक न येऊ शकतो. अशावेळी image तयार केल्यानंतर Canva सारख्या editor मध्ये मजकूर जोडावा.

५. लहान मुलांचे फोटो वापरणं सुरक्षित आहे का?

उत्तर: पालकांची संमती घेऊन आणि विश्वासार्ह AI services वापरून फोटो अपलोड करणे योग्य आहे.

६. एकच फोटो सर्व १६ प्रॉम्प्ट्ससाठी वापरता येईल का?

उत्तर: हो, स्पष्ट फोटो वेगवेगळ्या स्टाइल्ससाठी वापरता येतो.

७. फोटो तयार करायला किती वेळ लागतो?

उत्तर: हे AI tool आणि internet speed वर अवलंबून असते. साधारणपणे काही सेकंद ते काही मिनिटे लागू शकतात.

८. तयार झालेला फोटो व्यावसायिक वापरासाठी वापरता येईल का?

उत्तर: हे संबंधित AI tool च्या commercial-use policy वर अवलंबून असते. वापरण्यापूर्वी नियम तपासून घ्यावेत.

९. प्रॉम्प्टमध्ये कपडे किंवा रंग बदलता येतील का?

उत्तर: हो. कपड्यांचा रंग, fabric, jewellery किंवा background आवडीनुसार बदलता येतं.

१०. दोन बहिणी आणि एक भाऊ असल्यास prompt कसा बदलावा?

उत्तर: brother and sister ऐवजी one brother and two sisters असं स्पष्ट लिहावं आणि प्रत्येकाची जागा/पोझिशन देखील नमूद करावी.

११. Face swap किंवा Remaker AI वापरून रक्षाबंधन फोटो बनवता येईल का?

उत्तर: हो, पण ती वेगळी पद्धत आहे. या लेखातील प्रॉम्प्ट्स मुख्यतः AI image generation किंवा image-based generation साठी आहेत. Face-swap tools मध्ये तयार template किंवा फोटोमध्ये तुमचा चेहरा जोडला जातो, त्यामुळे prompt-based AI फोटो आणि face-swap फोटो यांचा result वेगळा असू शकतो.

संबंधित लेख

रक्षाबंधनाशिवाय  इतर सणांसाठीही AI फोटो प्रॉम्प्ट्स हवी असल्यास हा लेख पाहता येईल.

शेवटचा शब्द

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आठवणी जपण्याचा सण आहे. यंदा फक्त राखी बांधून न थांबता, वरील रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स वापरून हे नातं एका खास आणि सोशल मीडियावर शोभेल अशा पद्धतीने साजरं करता येईल.

जुन्या फोटोंना नवा रंग देऊन किंवा नव्या फोटोला पारंपरिक साज चढवून हा सण डिजिटल पद्धतीने अजून संस्मरणीय बनवता येतो.

यातील कोणता प्रॉम्प्ट सगळ्यात जास्त आवडला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!

लेखकाबद्दल

रविंद्र पारधी हे Marathi AI PROMPTS चे Founder आणि Content Creator आहेत. ते मराठी भाषेत AI Prompts, Prompt Engineering, ChatGPT, AI Image Generation आणि AI Tools यांसारख्या विषयांवर practical guides आणि tutorials तयार करतात.

त्यांचा उद्देश मराठी वाचकांसाठी AI शिकणं सोपं आणि practical बनवणं हा आहे.

1 thought on “रक्षाबंधन AI फोटो प्रॉम्प्ट्स – भाऊ-बहिणीसाठी 3D, पारंपरिक आणि सुंदर फोटो कल्पना”

Leave a Comment