Diwali AI Photo Prompts Marathi शोधताय? दिवाळीच्या संध्याकाळी दारात लटकणारा आकाशकंदील, पणत्यांचा उबदार प्रकाश, रंगीत रांगोळी आणि हातातली औक्षणाची थाळी अशी मराठमोळी दृश्यं AI फोटोमध्ये तयार करून पाहता येतात. कालनिर्णय २०२६ नुसार, दिवाळीतील प्रमुख सण ५ ते ११ नोव्हेंबर २०२६ दरम्यान येतात. फक्त सणांच नाव लिहिण्यापेक्षा prompt मध्ये कपडे, घराची सजावट, प्रकाश आणि प्रसंग स्पष्ट लिहिणं उपयोगी ठरतं.
या लेखात Maharashtrian Diwali AI Photo Prompts च्या स्वरूपात वसुबारास ते भाऊबीज, तसेच फराळ आणि सजावटीसाठी १६ ready-to-copy prompts दिले आहेत. स्वत:चा फोटो वापरण्याची पद्धतही सांगितली आहे. यातले ५ prompts मी ChatGPT मध्ये वापरून पाहिले आहेत, आणि त्यातली निरीक्षणं व चुका त्या त्या विभागात सांगितल्या आहेत. बाकीचे prompts मी अजून test केलेले नाहीत. निकाल tool नुसार बदलू शकतो.
या लेखातील AI Photo Prompts बद्दल: हे prompts दिवाळीतील पारंपरिक प्रसंग लक्षात घेऊन तयार केले आहेत. प्रत्येक prompt मधून मिळणारी image वापरलेल्या AI tool नुसार बदलू शकते. हात, चेहरे, पारंपरिक पोशाख, दागिने आणि पूजेतील तपशील image मध्ये अचूक असतीलच असं नाही, म्हणून तयार image वापरण्यापूर्वी ती तपासा. ज्या prompts ची मी प्रत्यक्ष चाचणी केली आहे, त्यांची निरीक्षणं त्या त्या सणाच्या विभागात दिली आहेत. प्रत्येक prompt च्या तक्त्यात “स्थिती” ही ओळ आहे, ती पाहा.
दिवाळीचे AI फोटो तयार करण्यासाठी १६ Diwali AI Photo Prompts Marathi
दिवाळीचे AI फोटो आणि festive portrait तयार करताना फक्त पाच गोष्टी लक्षात ठेवा.
१. Tool निवडा या लेखतले ५ prompts मी ChatGPT मध्ये वापरुन पाहिले आहेत. AI image generation साठी तुम्ही Gemini किंवा दुसरे image tools वापरू शकता, पण त्यात मी test केलेलं नाही, त्यामुळे निकाल वेगळा येऊ शकतो. Tool च्या मोफत वापराच्या मर्यादा आणि अटी वेळोवेळी बदलतात, म्हणून वापरण्यापूर्वी त्या तपासा.
२. Prompt copy करा खाली दिलेला prompt जसाच्या तसा copy करा आणि ChatGPT मध्ये (किंवा तुम्ही निवडलेल्या दुसऱ्या AI image tool मध्ये) paste करा. पहिल्या प्रयत्नात काहीही बदल करू नका. आधी image कशी येते ते पाहा, मग गरजेनुसार बदल करा.
३. स्वत:चा फोटो वापरायचा असेल तर तुमचा फोटो अपलोड करा आणि prompt च्या सुरुवातीला ही सूचना जोडून पाहा:
Edit the uploaded photo. Preserve the person’s original facial identity, facial features, hairstyle and natural skin tone. Change the clothing and background as described below.
त्यांनंतर संबंधित सणाचा prompt जसाच्या तसा जोडा. ही पद्धत मी स्वता: test केलेली नाही, म्हणून चेहरा, हात आणि कपडे तपासूनच image वापरा. दुसऱ्याचा फोटो वापरायचा असेल तर त्यांची परवानगी घ्या.
पारंपरिक मराठी लूकसाठी आणखी prompt उदाहरणे पाहायची असल्यास ChatGPT Marathi Look Prompt हा संबंधीत लेख वाचा. त्या लेखातील पद्धती मी दिवाळीच्या प्रतिमांसाठी स्वतंत्रपणे तपासलेल्या नाहीत.
४. योग्य आकार निवडा
आकार
कुठे वापरायचा
16:9 (आडवा)
Blog Featured Image, Facebook पोस्ट, YouTube thumbnail
या लेखातले बहुतेक prompts 16:9 आकारासाठी आहेत. Prompt १६ मोबाईल wallpaper साठी असल्यामुळे त्याचा आकार 9:16 आहे.
दुसऱ्या आकारात image हवी असल्यास prompt मधील आकार सांगणारा भाग बदला. उदाहरणार्थ, wide horizontal 16:9 frame किंवा horizontal 16:9 frame ऐवजी vertical 4:5 frame लिहून पाहा. हा बदल मी test केलेला नाही, त्यामुळे image ची रचना बदलू शकते.
Prompt मध्ये आकार लिहिला तरी प्रत्येक image tool तंतोतंत पाळेलच असं नाही. माझ्या पाचही ChatGPT चाचण्यांमध्ये image 16:9 आकारातच आली. दुसऱ्या आकारात image हवी असल्यास tool मधील उपलब्ध पर्याय वापरा किंवा तयार image crop करा. Crop करताना चेहरा, हात आणि सणाशी संबंधित महत्वाचे तपशील कापले जाणार नाहीत याची काळजी घ्या. Instagram DP साठी 1:1 वापरताना प्लॅटफॉर्मवर image कशी crop होते ते तपासा.
५. तयार image तपासा वापरण्यापूर्वी चेहरा, हात आणि बोटं, साडीची पद्धत, दागिने आणि पूजेतील तपशील (देवीची मूर्ती, थाळी, दिवे) तपासा. Image मध्ये आपोआप आलेला मजकूर किंवा watermark असेल तर दुसरी image वापरा. चुका कशा सुधारायच्या? या विभागात सांगितलं आहे.
वसुबारस (गोवत्स द्वादशी) या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते, आणि इथूनच दिवाळीची सुरुवात होते. गावाकडच्या गोठ्यातलं आणि अंगणातलं शांत, उबदार वातावरण हे या दिवसाचं वैशिष्ट्य आहे.
Prompt १: गाय-वासराची पारंपरिक पूजा
A Maharashtrian woman in a green nine-yard saree with a traditional nath and bangles, performing Vasubaras puja in front of a decorated cow and calf in a village courtyard. She holds a brass puja thali with diya, haldi-kumkum and flowers. Marigold garlands on the cow, rangoli at the entrance, soft early evening golden light, warm rustic composition, photorealistic details, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
साडीचा काष्टा, गाय-वासराची शरीररचना आणि हातातली थाळी
वसुबारस पूजेचं मराठमोळं दृश्य: गाय, वासरू आणि पूजेची थाळी. (AI ने तयार केलेली प्रतिमा)
माझी चाचणी (Prompt १):
Tool: ChatGPT, पहिला प्रयत्न, prompt मध्ये बदल नाही
काय चांगलं आलं: फुलांच्या माळांनी सजवलेली गाय आणि वासरू, सूर्यास्ताचा उबदार प्रकाश, पूजेची थाळी, रांगोळी आणि पितळी कलश
काय तपासलं: “nine-yard saree” लिहूनही साडीचा काष्टा स्पष्ट दिसला नाही; साडी नेहमीच्या पद्धतीने नेसल्यासारखी दिसली
सुधारणा: या प्रयत्नात बदल केला नाही
Prompt २: कुटुंबासह वसुबारस
A Maharashtrian family of four in traditional festive clothes, father in kurta and pheta, mother in a nine-yard saree, two children in ethnic wear, gently offering flowers and a puja thali to a cow and her calf in front of an old wada-style house. Banana leaves, mango torans and a small rangoli in the background, warm sunset glow, warm rustic composition, photorealistic details, horizontal 16:9 frame
घटक / निकष
तपशील
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
Facebook पोस्ट, कौटुंबिक शुभेच्छा card
अपेक्षित दृश्य
वाड्यासमोर पूर्ण कुटुंबाची पूजा
तपासा (Quality Check)
चौघांचे चेहरे आणि हात, प्राण्यांची शांत pose
चार व्यक्ती आणि दोन प्राणी एका image मध्ये असल्यामुळे चुका होण्याची शक्यता जास्त आहे. पर्यायी prompt (मुख्य १६ prompts मध्ये समाविष्ट नाही): वरचा prompt वापरल्यावर चुका दिसल्या तर हा सोपा पर्याय वापरून पाहा. हाही test केलेला नाही.
A Maharashtrian mother in a nine-yard saree and her young daughter in festive ethnic wear gently offering flowers to a decorated cow and calf in a village courtyard, with a small rangoli and banana leaves nearby, warm sunset glow, warm rustic composition, photorealistic details, horizontal 16:9 frame
धनत्रयोदशी AI Photo Prompts (६ नोव्हेंबर २०२६)
धनत्रयोदशीला (धनतेरस) लक्ष्मी-कुबेर पूजन, धन्वंतरी पूजा आणि नवीन भांडी किंवा सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. पूजेची मांडणी आणि दिव्यांचा उबदार प्रकाश हे या दिवसाच्या दृश्यातील महत्त्वाचे घटक आहेत.
Prompt ३: पारंपरिक पूजेची थाळी
A Maharashtrian woman in a maroon Paithani saree with a nath and gold jewellery, seated beside a puja setup for Dhanteras: a brass kalash, new copper and brass utensils, a small heap of coins, marigold flowers and rows of lit clay diyas on a wooden chowki. Soft warm indoor lamplight, shallow depth of field, warm festive composition, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा post
अपेक्षित दृश्य
नवीन भांडी आणि दिव्यांसह पूजेची मांडणी
तपासा
पैठणीचा काठ आणि पदर, भांड्यांचा आकार. नाण्यांवर वाचता येणारा मजकूर अपेक्षित नाही
Prompt ४: नवीन खरेदीचा आनंद
A Maharashtrian couple in festive traditional clothes, husband in a cream kurta and wife in a green nine-yard saree, smiling as they hold a new brass vessel together outside a decorated shop entrance with marigold torans and rangoli. Warm late-afternoon light, natural candid expressions, warm festive composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
Facebook पोस्ट, Blog image
अपेक्षित दृश्य
सणाच्या खरेदीचा जोडप्याचा आनंदी क्षण
तपासा
दोघांचे हात आणि भांडं धरण्याची पद्धत, दुकानाच्या पाटीवरचा मजकूर (शक्यतो अस्पष्ट येतो)
नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान) AI Photo Prompts (८ नोव्हेंबर २०२६, पहाट)
नरक चतुर्दशीला पहाटे सुगंधी तेल आणि उटणं लावून अभ्यंगस्नान करण्याची आणि नवीन कपडे घालण्याची परंपरा आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही ८ नोव्हेंबरला येतात, त्यामुळे पहाटेचा आणि संध्याकाळचा असे दोन वेगवेगळे scenes तयार करता येतात. म्हणूनच हे दोन विभाग वेगळे ठेवले आहेत.
अभ्यंगस्नान म्हणजे पहाटेचं स्नान, जे सूर्योदयापूर्वी करतात. कालनिर्णय २०२६ मध्ये अभ्यंगस्नानाची नोंद तीन दिवशी आहे; ८ नोव्हेंबरला (नरक चतुर्दशी), ९ नोव्हेंबरला (अमावास्या) आणि १० नोव्हेंबरला (पाडवा, प्रतिपदा). तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि स्थानिक पंचांगानुसार दिवस आणि वेळ ठरवा. या लेखातील अभ्यंगस्नानाचा prompt नरक चतुर्दशीच्या, म्हणजे ८ ८ नोव्हेंबरच्या पहाटेसाठी आहे.
Prompt ५: उटणं आणि पहाटेची तयारी
A Maharashtrian woman in a simple cotton saree with a shawl over her shoulders, applying fragrant ubtan from a small brass bowl on the hands of a smiling elderly woman, in a traditional courtyard at pre-dawn. A copper pot of warm water, rows of small clay diyas and a rangoli nearby, cool blue dawn light mixed with warm lamp glow, fully clothed and modest, warm family composition, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
✔ ChatGPT मध्ये test केला (पहिला प्रयत्न, 16:9)
उपयोग
“शुभ दिवाळी” पोस्ट, पहाटेच्या शुभेच्छा
अपेक्षित दृश्य
उटण्याची पारंपरिक तयारी, प्रत्यक्ष स्नान नाही
तपासा
दोघींचे हात, उटण्याची वाटी, पहाटेचा निळसर प्रकाश नैसर्गिक दिसतो का
अभ्यंगस्नानासाठी उटणं लावण्याचा प्रसंग. (ChatGPT मध्ये तयार केलेली AI प्रतिमा)
माझी चाचणी (Prompt ५):
Tool: ChatGPT, पहिला प्रयत्न, prompt मध्ये बदल नाही
काय चांगलं आलं: पहाटेचा निळसर प्रकाश आणि पणत्यांचा उबदार प्रकाश यांचा मेळ, उटणं लावण्याची कृती स्पष्ट, तांब्याचा हंडा, रांगोळी, पोशाख modest
काय तपासलं: घराची रचना कौलारू कोकणी घरासारखी दिसली
सुधारणा: या प्रयत्नात बदल केला नाही
Prompt ६: नवीन कपड्यांतील दिवाळीची सकाळ
A Maharashtrian family in new festive clothes, father in a kurta and dhoti, mother in a nine-yard saree, a teenage daughter in an ethnic lehenga-style dress, standing together at the doorway of their home, decorated with an akash kandil, rangoli and clay diyas. Soft golden sunrise light, natural smiles, warm family composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
कौटुंबिक फोटो post, Facebook पोस्ट
अपेक्षित दृश्य
पहाटेनंतरची आनंदी दिवाळी सकाळ
तपासा
तिघांचे कपडे आणि दागिने, आकाशकंदिलाचा आकार
लक्ष्मीपूजन AI Photo Prompts (८ नोव्हेंबर २०२६, संध्याकाळ)
लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. संध्याकाळी लक्ष्मी-कुबेर पूजन, पणत्या, रांगोळी, झेंडूची आरास आणि दिव्यांनी उजळलेलं घर हे या दिवसाचं चित्र असतं. पारंपरिक पोशाख आणि मराठमोळा लूक prompt मध्ये स्पष्ट लिहिल्यास दृश्य सणाला साजेसं येण्याची शक्यता वाढते. पूजेची वेळ शहरानुसार आणि स्थानिक पंचांगानुसार बदलते, म्हणून अचूक मुहूर्तासाठी तुमचं पंचांग पाहा.
Prompt ७: पूजेची थाळी घेतलेली स्त्री
A Maharashtrian woman in a deep red nine-yard saree with a nath, bangles and gold necklace, standing beside a beautifully lit Lakshmi puja arrangement at home, holding an aarti thali with a diya. Marigold garlands, rangoli at the threshold, clay diyas on every ledge, warm golden evening light, warm festive composition, natural hand positions, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
✔ ChatGPT मध्ये test केला (पहिला प्रयत्न, 16:9)
उपयोग
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा, Blog आणि Facebook image
अपेक्षित दृश्य
दिव्यांनी उजळलेल्या घरात आरतीची थाळी
तपासा
थाळी धरलेली बोटं, नथेचा आकार, पूजेच्या मांडणीतील धार्मिक चिन्हं
लक्ष्मीपूजनाच्या सजावटीजवळ आरतीची थाळी घेतलेली स्त्री. (ChatGPT मध्ये तयार केलेली AI प्रतिमा)
माझी चाचणी (Prompt ७):
Tool: ChatGPT, पहिला प्रयत्न, prompt मध्ये बदल नाही
काय चांगलं आलं: लाल साडी, नथ, बांगड्या, गजरा, हातात दिव्याची थाळी, झेंडूची आरास, पणत्या आणि रांगोळी, संध्याकाळचा उबदार प्रकाश, आणि लक्ष्मीची मूर्ती कमळासह स्पष्ट व पारंपरिक दिसली
काय तपासलं: साडी नऊवारी काष्टा पद्धतीची दिसली नाही
सुधारणा: या प्रयत्नात बदल केला नाही
पारंपरिक मराठमोळ्या पोशाखातील आणखी पोर्ट्रेट कल्पना पाहण्यासाठी Maharashtrian Cinematic Portrait AI Prompts हा लेखही पाहू शकता.
Prompt ८: कुटुंबासह लक्ष्मी-कुबेर पूजन
A Maharashtrian family performing Lakshmi puja together in a decorated living room, father and mother seated with folded hands before a small puja altar with a softly blurred framed picture of the goddess in the background, a brass lamp, flowers and sweets, two children beside them in festive wear. Warm diya glow, marigold decorations, rangoli in the foreground, warm family composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
कौटुंबिक शुभेच्छा post
अपेक्षित दृश्य
घरातील पारंपरिक पूजन
तपासा
चौघांचे हात, पूजेच्या मांडणीतील तपशील
देवीच्या चित्राचे तपशील अचूक हवे असतील तर तुमची स्वतःची reference image अपलोड करून “use the uploaded image as the framed picture” असं लिहा. हा पर्याय मी test केलेला नाही.
Prompt ९: दुकानातील वही-पूजन
A Maharashtrian shop owner in a cream kurta and a traditional cap, seated at a low desk in his small shop performing vahi-pujan, with new ledger books, a brass lamp, sweets, marigold flowers and rangoli around him. Warm evening lamplight, a calm focused expression, warm festive composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
व्यावसायिक शुभेच्छा, दुकानदारांसाठी
अपेक्षित दृश्य
लक्ष्मीपूजनातील वही-पूजनाचा क्षण
तपासा
वहीवरचा मजकूर (अस्पष्ट येऊ शकतो), टोपीचा प्रकार
दिवाळी पाडवा AI Photo Prompts (१० नोव्हेंबर २०२६)
दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. कालनिर्णय २०२६ नुसार तो १० नोव्हेंबर २०२६ रोजी आहे, पण काही दिनदर्शिकांमध्ये ९ नोव्हेंबरचीही नोंद दिसते, म्हणून तुमच्या स्थानिक पंचांगात एकदा पाहा. या दिवशी पती-पत्नीचं औक्षण, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि कौटुंबिक आनंद यांना महत्त्व असतं. व्यापारी समाजात या दिवशी नवीन वर्षाची (विक्रम संवत) सुरुवात मानली जाते, तर काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. खालील prompts मध्ये औक्षणाचा प्रसंग केंद्रस्थानी आहे. साडी किंवा पूजेचे तपशील प्रत्येक वेळी अचूक दिसतीलच असं नाही, म्हणून तयार image तपासा.
Prompt १०: पाडव्याचे औक्षण
A Maharashtrian wife in a green Paithani saree performing aukshan on her husband with an aarti thali, diya and a small sweet, while the husband in a cream kurta smiles warmly. Decorated doorway with rangoli and torans, soft morning light, warm festive composition, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
✔ ChatGPT मध्ये test केला (पहिला प्रयत्न, 16:9)
उपयोग
जोडप्याचा फोटो, पाडव्याच्या शुभेच्छा
अपेक्षित दृश्य
दारातलं पारंपरिक औक्षण
तपासा
थाळी आणि दिव्याची स्थिती, दोघांचे हात आणि चेहऱ्यावरचे भाव
दिवाळी पाडव्याच्या औक्षणाचा मराठमोळा प्रसंग. (ChatGPT मध्ये तयार केलेली AI प्रतिमा)
माझी चाचणी (Prompt १०):
Tool: ChatGPT, पहिला प्रयत्न, prompt मध्ये बदल नाही
काय तपासलं: दाराच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील लाकडी पाटीवर “॥ श्री ॥” असा मजकूर आपोआप दिसला. Prompt मध्ये या मजकुराचा उल्लेख नव्हता
सुधारणा: या प्रयत्नात बदल केला नाही
Prompt ११: भेटवस्तू आणि कौटुंबिक क्षण
Four Maharashtrian adults in festive traditional clothes in a decorated living room: a couple exchanging a small wrapped gift, the wife in a nine-yard saree and the husband in a kurta, with the husband’s parents smiling beside them. Rangoli, flowers, a plate of Diwali faral on the table, warm evening lamp glow, warm family composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
पाडव्याच्या शुभेच्छा, कौटुंबिक post
अपेक्षित दृश्य
पाडव्याचा आनंदी कौटुंबिक क्षण
तपासा
चौघांचे चेहरे, फराळाच्या ताटातील पदार्थ
भाऊबीज AI Photo Prompts (११ नोव्हेंबर २०२६)
भाऊबीज (यमद्वितीया) या दिवशी बहीण पाटावर बसलेल्या भावाला औक्षण करून ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. भावा-बहिणीचं प्रेम आणि कौटुंबिक जिव्हाळा हा या दिवसाचा गाभा आहे.
A Maharashtrian sister in a nine-yard saree performing aukshan on her younger brother, who wears a kurta, with a brass thali, diya, kumkum and sweets, seated on a decorated wooden paat with a rangoli in front. Soft warm lamplight, affectionate smiles, warm family composition, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
✔ ChatGPT मध्ये test केला (पहिला प्रयत्न, 16:9)
उपयोग
भाऊबीजेच्या शुभेच्छा, Blog आणि Facebook image
अपेक्षित दृश्य
पाटावर बसलेल्या भावाचं औक्षण
तपासा
थाळीतली मांडणी, दोघांचे हात, कुंकवाचा टिळा नैसर्गिक दिसतो का
भाऊबीजेच्या औक्षणाचा प्रसंग. (ChatGPT मध्ये तयार केलेली AI प्रतिमा)
माझी चाचणी (Prompt १२):
Tool: ChatGPT, पहिला प्रयत्न, prompt मध्ये बदल नाही
काय चांगलं आलं: बहीण भावाला कुंकवाचा टिळा लावते आहे ही कृती स्पष्ट, पाट, रांगोळी आणि पणत्या, फराळाची थाळी
काय तपासलं: prompt मध्ये “younger brother” असा उल्लेख असूनही, image मधील भाऊ किशोरवयीन किंवा त्यापेक्षा मोठा असल्यासारखा दिसला. साडी नऊवारी पद्धतीची दिसली नाही
सुधारणा: या प्रयत्नात बदल केला नाही
Prompt १३: भेटवस्तूंची देवाणघेवाण
Adult brother and sister in traditional festive clothes exchanging gifts and sweets in a decorated living room, sister in a Paithani saree, brother in a kurta, laughing together. Marigold garlands, diyas on a side table, rangoli nearby, warm evening glow, warm family composition, horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
Facebook पोस्ट, भावा-बहिणीसाठी card
अपेक्षित दृश्य
भेटवस्तूंसह हसणारं भावंडांचं जोडपं
तपासा
हात आणि हातातील भेटवस्तू, पैठणीचं डिझाईन
Prompt १४: बालपणीच्या आठवणी
Adult brother and sister sitting together on a decorated swing at home, looking through an old childhood photo album and laughing, sister in a nine-yard saree, brother in a kurta. Warm evening light through a window, diyas and rangoli nearby, nostalgic warm composition, wide composition with the surroundings visible, wide horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
भावनिक post, “बालपणीची भाऊबीज” थीम
अपेक्षित दृश्य
आठवणींतली भाऊबीज
तपासा
झोपाळ्याची रचना, अल्बमच्या फोटोंवरचे चेहरे (अस्पष्ट असले तरी चालतील)
दिवाळी स्पेशल: फराळ, आकाशकंदील आणि रांगोळी
सणांच्या दिवसांपलीकडे दिवाळीची सजावट आणि फराळ यांचे दोन स्वतंत्र prompts. यात व्यक्ती नाहीत, त्यामुळे चेहऱ्या-हातांच्या चुकांची शक्यता कमी आहे.
Prompt १५: पारंपरिक दिवाळी फराळाचं ताट
A traditional Maharashtrian Diwali faral spread arranged neatly on a large brass thali and small bowls, featuring chakli, karanji, ladoos, shankarpali, chivda and anarse, placed on a low wooden paat with a small rangoli beside it. Fresh marigold flowers and a single lit clay diya next to the thali, warm festive lighting, realistic food textures, natural colors, detailed food photography, food-only still life composition, wide horizontal 16:9 frame
स्थिती
अजून test केलेला नाही
उपयोग
Blog, Facebook पोस्ट, दिवाळी शुभेच्छा
अपेक्षित दृश्य
पाटावर मांडलेलं फराळाचं ताट, शेजारी दिवा आणि फुलं
तपासा
प्रत्येक पदार्थ ओळखता येतो का (करंजीचा आकार, चकलीची गुंफण), एकच पदार्थ पुन्हा पुन्हा आला आहे का, दिव्याची ज्योत नैसर्गिक आहे का
Prompt १६: आकाशकंदील, पणत्या आणि रांगोळी (मोबाइल wallpaper, 9:16)
A beautifully decorated Maharashtrian home entrance during Diwali, with a traditional colorful akash kandil hanging above the doorway, rows of glowing clay diyas along the steps and an intricate colorful rangoli at the entrance. Marigold garlands and mango leaf torans on the door, warm golden evening light, inviting festive atmosphere, balanced composition with clear open space in the center, photorealistic details, clean uncluttered composition, vertical 9:16 frame
आकाशकंदिलाची रचना (अनेकदा विचित्र आकार येतो), पणत्यांची रांग, रांगोळीची सममिती, पायऱ्यांचा दृष्टिकोन
हा prompt मोबाइल wallpaper साठी उभ्या 9:16 आकाराचा आहे, म्हणून तो इतर prompts पेक्षा वेगळ्या आकारात दिसेल.
प्रतिमेतील चुका कशा सुधारायच्या?
AI ने तयार केलेली image लगेच वापरू नका. चेहरा, हात, कपडे आणि सणाशी संबंधित तपशील आधी तपासा. Prompt मध्ये एखादी गोष्ट स्पष्ट लिहिली असली तरी ती तशीच दिसेल याची हमी नसते.
मी या लेखातले ५ prompts (१, ५, ७, १०, १२) ChatGPT मध्ये, पहिल्या प्रयत्नात, 16:9 आकारात वापरून पाहिले. खाली त्या चाचण्यांमध्ये प्रत्यक्ष दिसलेल्या चुका आणि त्यांवर सुचवलेले बदल दिले आहेत. हे बदल मी अजून test केलेले नाहीत, त्यामुळे ते “सुचवलेले” आहेत, “हमखास” नाहीत.
माझ्या ५ चाचण्यांत प्रत्यक्ष काय दिसलं
Prompt
काय दिसलं
सुचवलेला बदल (test न केलेला)
१, ७, १२ (साडी)
“nine-yard saree” लिहूनही काष्टा स्पष्ट दिसला नाही; साडी नेहमीच्या पद्धतीने नेसल्यासारखी दिसली
nine-yard Maharashtrian kashta-style saree असं अधिक स्पष्ट लिहा
१० (पाडवा)
दाराच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील लाकडी पाटीवर “॥ श्री ॥” हा मजकूर आपोआप दिसला; prompt मध्ये त्याचा उल्लेख नव्हता
plain wooden door and plain cream wall असं सकारात्मक वर्णन द्या
१२ (भाऊबीज)
“younger brother” लिहूनही image मधील भाऊ किशोरवयीन किंवा मोठा असल्यासारखा दिसला
तुम्हाला अपेक्षित असलेलं वय स्पष्ट लिहा, उदा. a young boy of about ten years old
५ (अभ्यंगस्नान)
घर कौलारू कोकणी शैलीचं दिसलं
old Maharashtrian wada courtyard असं ठिकाण निश्चित करून पाहा
Featured Image चा अनुभव
या लेखाच्या Featured Image मध्ये पारंपरिक साडी घातलेली स्त्री औक्षणाची थाळी घेऊन सजवलेल्या दारासमोर उभी आहे. दारावर आकाशकंदील आणि आंब्यांच्या पानांचं तोरणं, बाजूला झेंडूच्या माळा, पायऱ्यांवर पणत्या आणि पुढे रांगोळी दिसते. ही AI ने तयार केलेली प्रतिमा आहे. मी prompt मध्ये traditional kashta drape clearly visible असं लिहिलं होतं, तरी तयार image मध्ये नऊवारीचा काष्टा ओळखता आला नाही. म्हणून वर्णनात “पारंपरिक साडी” असं लिहिलं आहे.
पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर स्त्रीला पूर्ण लांबीत आणि समोरून दाखवण्याची सूचना देता येईल:
Full-length view from the front, standing straight, with the traditional nine-yard kashta drape clearly visible.
ही ओळ मी test केलेली नाही.
Title साठी मी डावीकडे रिकामी जागा मागितली होती, पण image मध्ये स्त्री उजव्या कडेला आली आणि डावीकडे आकाश, झाडं आणि भिंत आली.
वापरण्यापूर्वीची अंतिम तपासणी
Prompt मध्ये photorealistic असं लिहिलं तरी image प्रत्येक वेळी वास्तवदर्शी दिसेलच असं नाही. Image पूर्ण आकारात पाहा आणि हे तपासा: चेहरा आणि हात, साडीची पद्धत, दागिने, आपोआप आलेला मजकूर, watermark, आणि पूजेतील तपशील (देवीची मूर्ती, थाळी, दिवे). स्पष्ट चुका असतील तर image पुन्हा तयार करा किंवा दुसरी निवडा. थाळी आणि दिवा असलेल्या images मध्ये बोटांची रचना आणि थाळी धरण्याची पद्धत विशेष तपासा.
Prompt मधल्या सूचना म्हणजे AI साठी मार्गदर्शन आहे, हमी नाही. प्रत्यक्ष तयार झालेली image तपासूनच ती वापरा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
दिवाळी २०२६ मध्ये कधी आहे?
कालनिर्णय २०२६ नुसार वसुबारस ५ नोव्हेंबरला, धनत्रयोदशी ६ नोव्हेंबरला, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबरला, दिवाळी पाडवा १० नोव्हेंबरला आणि भाऊबीज ११ नोव्हेंबरला आहे. शहरानुसार मुहूर्तात थोडा फरक असू शकतो, म्हणून तुमच्या स्थानिक पंचांगात एकदा पाहा.
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी कसे येतात?
कालनिर्णय २०२६ नुसार ८ नोव्हेंबरला सकाळी चतुर्दशी तिथी असते आणि दिवसा नंतर अमावास्या सुरू होते. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे दोन्ही प्रसंग त्याच दिवशी येतात. म्हणूनच या लेखात दोन्हींसाठी वेगळे prompts दिले आहेत.
दिवाळीचे AI फोटो मोफत तयार करता येतात का?
काही AI tools मध्ये मर्यादित मोफत वापराची सुविधा मिळते. मात्र, वापराच्या अटी आणि मर्यादा वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे संबंधित tool च्या सध्याच्या अटी तपासूनच त्याचा वापर करा.
स्वतःचा फोटो वापरून मराठमोळा दिवाळी लुक कसा तयार करायचा?
तुमचा फोटो tool मध्ये अपलोड करून prompt च्या सुरुवातीला Edit the uploaded photo. Preserve the person’s original facial identity, facial features, hairstyle and natural skin tone. Change the clothing and background as described below.
ही सूचना जोडा, आणि त्यानंतर सणाचा prompt लिहा. ही पद्धत मी स्वतः test केलेली नाही. निकाल tool नुसार बदलू शकतो आणि चेहऱ्याची वैशिष्ट्यं बदलू शकतात, म्हणून चेहरा आणि हात तपासा.
Prompts इंग्रजीत का आहेत? मराठीत वापरता येतात का?
Prompts इंग्रजीत दिले आहेत आणि त्यात नऊवारी, औक्षण, फराळ असे मराठी शब्द इंग्रजी अक्षरांत ठेवले आहेत. तुम्ही मराठीतही prompts लिहून पाहू शकता, पण निकाल tool नुसार वेगळे येऊ शकतात. म्हणून दोन्ही पद्धती वापरून पाहा.
AI फोटोतील चेहरा आणि हात नैसर्गिक कसे ठेवायचे?
Prompt मध्ये व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवा आणि natural facial features व natural hand position यांसारख्या सूचना देऊन पाहा. Image तयार झाल्यानंतर चेहरा, हात आणि दागिने काळजीपूर्वक तपासा. या सूचनांमुळे प्रत्येक वेळी अपेक्षित सुधारणा होईलच असं नाही. सविस्तर सूचना “प्रतिमेतील चुका कशा सुधारायच्या?” या विभागात आहेत.
शेवटी
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचा एक वेगळा प्रसंग असतो, आणि prompt मध्ये कपडे, सजावट, प्रकाश आणि प्रसंग स्पष्ट लिहिले की image सणाशी जुळण्याची शक्यता वाढते. या लेखातले पाच prompts मी ChatGPT मध्ये वापरून पाहिले आहेत, बाकीचे अकरा अजून test केलेले नाहीत. तुम्ही कोणता prompt वापरला आणि image कशी आली, ते comment मध्ये सांगा. दिवाळीच्या शुभेच्छा!
लेखकाबद्दल
रविंद्र पारधी — Founder of Marathi AI Prompts
नमस्कार! मी रविंद्र पारधी, Marathi AI Prompts चा Founder आणि Content Creator. मराठी वाचकांसाठी AI Prompts, Prompt Engineering, ChatGPT Tips आणि AI Image Generation यांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन आणि tutorials लिहितो. अधिक माहितीसाठी माझं Founder पान पाहा.